समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या संदीप जाधव यांच्या निधनाने समर्पित कार्यकर्ता हरपला; मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली
पिंपरी-चिंचवड : ‘निर्मल वारी’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता आणि सेवाभावाचा जागर निर्माण करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य संदीप शिवाजी जाधव यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, संघविचारांशी निष्ठा जपत समाजहितासाठी सातत्याने कार्य करणारा एक समर्पित कार्यकर्ता आपण गमावला आहे. ‘निर्मल वारी’ अभियानाच्या माध्यमातून संदीप जाधव यांनी स्वच्छता आणि सेवाभावाचा आदर्श समाजासमोर निर्माण केला. त्यांचे सामाजिक योगदान आणि सेवाकार्य सदैव स्मरणात राहील.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि जाधव कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना!, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.