डिजिटल तंत्रज्ञानामुळे दंतचिकित्सा उपचार अधिक अचूक आणि सुलभ – मंत्री चंद्रकांत पाटील

21

पुणे : डिजिटल तंत्रज्ञानामुळे दंतचिकित्सा क्षेत्रात झपाट्याने सकारात्मक बदल होत असून, या तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक अचूक, सुलभ आणि प्रभावी होत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दंतचिकित्सा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नव्या उपचारपद्धतींच्या आदानप्रदानाला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे (ISDD) आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ना. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

उद्घाटनपर मनोगतात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या परिषदेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करून सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन यांची सांगड घातल्याने रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिषदेला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे (MCCIA) महासंचालक प्रशांत गिरबाने, ISDD चे अध्यक्ष डॉ. रत्नदीप जाधव, संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज चिवटे, सचिव डॉ. विजय ताम्हाणे, संचालक व खजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. विपीन माहूरकर यांच्यासह देशभरातील नामवंत दंतवैद्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.