चंद्रकांत पाटील यांच्याकडून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचे पुण्यात स्वागत, कोथरूडमध्ये लाभार्थी संमेलनास करणार संबोधित
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी अनेक योजना ज्या केंद्रसरकारने राबविल्या आहेत त्यांचा मागोवा आणि लाभार्थ्यांची भेट याकरिता त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध राज्यांमध्ये लाभार्थी संमेलन आयोजित करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोथरूड मतदार संघामध्ये आज लाभार्थी संमेलन होणार आहे.
कोथरूड आशिष गार्डन येथे होणाऱ्या लाभार्थी संमेलनास उत्तर प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज आज पुण्यात उत्तर प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचे पुण्याच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांची भेट घेऊन पुण्यात त्यांचे स्वागत केले. यावेळी केशव मौर्य आणि पाटील यांच्या मध्ये सोबत अनेक विषयांवर चर्चा झाली.