महिला व रुग्णांसाठी चंद्रकांत पाटील यांच्या दोन महत्वकांक्षी योजना, जनसेवेचे कार्य अविरत सुरु राहणार
पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी कोथरूड येथील लाभार्थी संमेलनास हजेरी लावली यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कोथरूड येथील आशिष गार्डन मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दोन महत्वाकांक्षी योजनांची माहिती दिली. ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणारी कंपनी सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी कर्वे शिक्षण संस्थेसोबत करार करण्यात आला असून संस्थेमार्फत ७ दिवसात प्रशिक्षण आणि त्याचे प्रमाणपत्र महिलांना देण्यात येणार आहे. यासोबत पाटील यांच्याकडून महिलांना एक बॅग, प्रवास भत्ता, एप्रन आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ५०० रुपये बक्षीस देखील दिल जाणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून ज्या महिलांना उद्योगासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून हवा आहे तो सुद्धा सीए मार्फत मोफत करून दिला जाईल असे हि पाटील यांनी यावेळी सांगितले. बिनव्याजी सिड कॅपिटल मधील काही रक्कम सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आम्ही महिलांना पायावर उभ करण्यासाठी हि कंपनी सुरु केली आहे असं पाटील यांनी सांगितले.
यासोबतच दुसऱ्या योजने बद्दल सांगतांना पाटील म्हणाले कि वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांनी पुष्प हार न आणता रुग्णांना हॉस्पिटल बिलामध्ये मदत मिळण्याकरिता कार्यकर्त्यांमार्फत सुरु असणाऱ्या ४ ट्रस्टला मदत करा असे आवाहन केल्याप्रमाणे लोकांनी शुभचिंतकांनी भरगोस शुभेच्छा रुपी मदत केली असून, भविष्यात एकही रुग्ण मदतीशिवायच परत जाणार नाही अशी खात्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
