टिळेकर नगर- कामठे पाटील नगर येवलेवाडीला जोडणाऱ्या रस्त्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

19

पुणे : कोंढवा भागातील टिळेकर नगर-कामठे पाटील नगर-येवलेवाडीला जाणारा मुख्य रस्त्यासाठीची नागरिकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून या राश्त्यासाठी तब्बल तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सदर कामाचे भूमिपूजन पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

भूमिपूजन प्रसंगी चंद्रकांत पाटील म्हणाले कि “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ज्या विकासकामांचे भूमिपूजन करतात, त्याचे उद्घाटन ही त्यांच्याच कार्यकाळात होत आहे. मोदींच्या नेतृत्वात विकासाची ही गती आहे. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात विकासकामे झपाट्याने होत आहेत. सोबतच त्यांनी टिळेकर नगर- कामठे पाटील नगर येवलेवाडीला जोडणारा रस्त्याचे काम ही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, तसेच मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.