संस्थांनी शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आपले योगदान द्यावे – चंद्रकांत पाटील

31

सातारा : श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगडच्या वतीने देण्यात येणारा श्री समर्थ रामदासस्वामी पुरस्कार पुण्यातील समर्थ व्यासपीठाला जाहीर झाला होता‌. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

श्री श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजकांकडून चंद्रकांत पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आला.

यावेळी पाटील यांनी “पूज्य महाराजांचे आशीर्वाद आणि समर्थ रामदासस्वामी संस्थानचा प्रसाद प्राप्त झाला. आगामी काळात मूल्यशिक्षणासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांनी शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.