पुणे महापालिकेच्या शिक्षण सेवकांना मोठा दिलासा, मानधनासंदर्भातील शासन आदेश तातडीने लागू करा, चंद्रकांत पाटीलांचे निर्देश

32

पुणे : पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांच्या मागण्यांसंदर्भातील बैठक आज पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षतेखाली पार पडली. याबैठकीत महानगरपालिकेतील शिक्षण सेवकांच्या प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा झाली.

यावेळी पुणे महापालिकेच्या शिक्षण सेवकांना मोठा दिलासा देवून त्यांच्या मानधनासंदर्भातील शासन आदेश तातडीने लागू करा, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच, महापालिकेने ९३ शिक्षण सेवकांसदर्भातील नगरविकासकडे पाठविलेल्या प्रस्तावासंदर्भात पाठपुरावा करु, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, कुणाल‌ खेमनार, शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह शिक्षण सेवकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.