बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥ धन्यवाद दादा..
पुणे : राजकारण म्हंटले कि आश्वासन आलेच पण काही नेते..फक्त आश्वासनं न देता दिलेला शब्द पाळतात आणि जनतेचे काम हि करतात. पुण्याचे पालकमंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यतत्परतेचा अनुभव नुकताच कोथरुडमतदारसंघातील सुस परिसरातील नागरिकांना घेता आला.
याविषयीचा अनुभव कोथरूड मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. पोस्टमध्ये जोशी यांनी बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥ आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील ह्यांनी गेल्या रविवारी सुस रोड येथील माऊंट युनिस ह्या सोसायटी सपंर्क अभियानात, सुस पुलाचा शेजारील सर्विस रोड येथील अतिक्रमण काढून, रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्याचे आश्वासन दिले आणि आज सदर कामाची सुरुवात देखील झाली. धन्यवाद दादा…असे म्हणत चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत.
राज्याच्या उच्च तंत्रशिक्षण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या वेळ न दवडता सोडविण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील नेहमीच आग्रही असतात. अशा पोस्टच्या माध्यमातून पुन्हा हि गोष्ट अधोरेखित होते.
