गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे समाजाला दिशा देणाऱ्या गुरुतूल्य व्यक्तिमत्त्वांचा सन्मान

24

पुणे : काल पुण्याचे पालकमंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे समाजाला दिशा देणाऱ्या गुरुतूल्य व्यक्तिमत्त्वांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सन्मान करुन, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केल्याचे पाटील म्हणाले. या कार्यक्रमाबद्दल आदरणीय रघुनाथ माशेलकर सरांनी समाधान व्यक्त केले आणि भारतरत्न अटल बिहारी वाजेपेयींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शिक्षकांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे, अशी भावनासुद्धा सरांनी व्यक्त केली. याबाबत तात्काळ पाटील यांनी त्यांची ही इच्छा आज्ञा मानून आगामी काळात उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुजनांचा शिक्षक दिनी सन्मान करण्यासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही हि दिली.

यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अस्थीशल्य विशारद डॉ.के.एच.संचेती, सिम्बॉयसिसचे शां.ब. मुजुमदार, पदमश्री गिरीश प्रभुणे, लेफ्ट.जन. डॉ.डी.बी.शेकटकर, डॉ. गो.बं.देगलूरकर,प्राध्यापक डॉ. महाजन, प्रा.डॉ. सदानंद मोरे, नॅनो सायंटिस्ट डॉ. सुलभा कुलकर्णी, प्रा.डॉ.अशोक कामत, जेष्ठ गिर्यारोहक उ:षप्रभा पागे, प्रा.डॉ.रवींद्र कुलकर्णी, कृषीतज्ञ् दत्तात्रय बापट, राष्ट्रीय कीर्तनकार हभप मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर महाराज आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.