भविष्यातही इथल्या नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर, आयडियल कॉलनी भागातील नागरिकांना चंद्रकांत पाटील यांनी दिली ग्वाही
पुणे : पुण्याचे पालकमंत्री तसेच कोथरूड मतदारसंघाचे आमदार यांनी आयडियल कॉलनी भागातील नागरिकांशी काही दिवसांपूर्वी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. ज्यामध्ये आयडियल सोसायटीचा भाग मोठा असल्याने, महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने संपूर्ण भागात सीसीटीव्ही बसविण्याची गरज असल्याचे सांगितले होते. तसेच, सदर भागात काही अनुचित प्रकार ही घडत असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती.
पाटील यांनी त्यावेळी तातडीने पोलिसांना गस्त वाढविण्याची सूचना केली होती. त्यानुसार पोलिसांनी गस्त वाढवून भागातील अनुचित प्रकार रोखले. आज या भागात लोकसहभागातून संपूर्ण भागात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले, याचे लोकार्पण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पाटील यांनी भविष्यातही इथल्या नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली. आयडियल कॉलनी परिसरातील नागरिक, भाजप कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी तसेच स्थानिक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
