पार्किंगची समस्या सोडविल्याबद्दल कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन आणि पुणे व्यापारी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार

28

पुणे : कर्वे रस्त्यावरील मेट्रोचे तसेच उड्डाणपुलाचे काम सुरु असल्यापासून रस्त्यावरील पार्किंगला बंदी करण्यात आली होती. यामुळे अनेक छोटे मोठे दुकानदार, व्यापारी यांची गैरसोय सोट होती. कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशने याबाबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची काही दिवसापूर्वी भेट घेतली होती तेंव्हा पाटील यांनी पालिका प्रशासन आणि आरटीओला तात्काळ हि पार्किंग सुविधा पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे कर्वे रस्त्यावरील दुकानदार तसेच व्यापारी वर्ग यांना मोठा दिलासा मिळाला.

याच पार्श्वभूमीवर कोथरुडमधील कर्वे रस्ता येथील व्यापाऱ्यांची पार्किंगची समस्या सोडविल्याबद्दल कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन आणि पुणे व्यापारी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनच्या वतीने पुण्याचे पालकमंत्री तथा कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशनचे संस्थापक हस्तीमलजी चंगेडिया, उपाध्यक्ष बक्षरसिंग तलवार, अजित सांगळे, सचिव सुमतीलाल लोढा, संजीव गुजर, खजिनदार राजेश मेहता, शैलेश संत, हरिश पटेल, तेजस महाडिक, नंदू भेटवरा, क्षमा वाघ, पुणे व्यापारी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, अजित धावडे, अजित सांगळे, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, मनसेचे हेमंत संभूस उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.