हा समस्त देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण!! चंद्रकांत पाटीलांनी केले पंतप्रधान मोदी आणि ISRO च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन
पुणे : आज भारताचे चंद्रयान ३ आपल्या नियोजित वेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून आकाशात झेपावले. चंद्राच्या पृष्ठभागाचा शास्रीय प्रयोगात्मक अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे भारताचे एक मोठे पॉल आहे. या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांनी देशवासीयांचे, पंतप्रधान मोदी तसेच इसरोच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
अभिनंदन पर केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये पाटील यांनी हा समस्त देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण!! असल्याचे सांगत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची नियोजित तिसरी चंद्र शोध मोहिमेची यशस्वी सुरुवात आज झाली आजच्या या ऐतिहासिक दिवसाचा माझ्या कोथरुडमधील निवासस्थानावरुन साक्षीदार झालो.
भारताचे दूरदर्शी पंतप्रधान श्री Narendra Modi जी आणि ISRO – Indian Space Research Organization च्या संपूर्ण टीमचे या गौरवशाली क्षणांसाठी मनापासून अभिनंदन.असे पाटील यांनी म्हंटले आहे.