जेष्ठ गणितज्ज्ञ, लेखिका डॉ. मंगला जयंत नारळीकर यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी जेष्ठ गणितज्ज्ञ, लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरी डॉ. मंगला नारळीकर यांची प्राणज्योत मालवली. गेले काही महिने डॉ. मंगला नारळीकर यांना कर्करोगामुळे त्रस्त होत्या.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जेष्ठ गणितज्ज्ञ, लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांनी श्रद्धांजली अर्पण करत काही आठवणींना उजाळा दिला आहे.
पाटील म्हणतात डॉ. मंगला नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली. विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण होण्यासाठी मंगलाताई यांनी विशेषत्वाने काम होते. त्यासाठी त्यांनी लिहिलेली गणिताच्या सोप्या वाटा, नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं हे प्रवासवर्णन यासारखी त्यांची पुस्तकं विशेष गाजली होती. त्यांचे गणित विषयांवरील प्रभूत्वामुळे शासनाने बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली होती. डॉ. मंगलाताई सारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना!
डॉ. मंगला नारळीकर यांनी लिहिलेली अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके गजाली आहेत. मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बीए ही पदवी मिळाली होती त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या. त्यांना तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले होते.