कोथरूड मधून दहशतवाद्यांना अटक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन.!
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते लवकरच होणार विशेष सत्कार
पुणे : पुण्याच्या कोथरूड भागातून १८ जुलै मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने कोथरूड परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर NIA कडून 5 लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं. हे दहशतवादी गेल्या दीड वर्षांपासून ते फरार होते. पुणे पोलीस दलातील दोन कर्तव्यदक्ष जवानांनी कोथरुडमधून त्यांना अटक केली असून पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. कोथरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील फेसबुक पोस्टद्वारे कोथरुड पोलीस स्टेशनचे शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझ यांनी कोथरुड भागात गस्त घालत असताना २ संशयित दहशतवाद्यांना जीवाची बाजी लावून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या या जिगरबाज कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन व कौतुकअभिनंदन व कौतुक केले आहे.तसेच लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे हि जाहीर केले आहे.