कोथरूड मधून दहशतवाद्यांना अटक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव

35

पुणे : पुण्याच्या कोथरूड भागातून १८ जुलै मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने कोथरूड परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर NIA कडून 5 लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं. हे दहशतवादी गेल्या दीड वर्षांपासून ते फरार होते. पुणे पोलीस दलातील दोन कर्तव्यदक्ष जवानांनी कोथरुडमधून त्यांना अटक केली असून पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वांकडून कौतुक झाले. कोथरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.

आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पुण्यातील निवासस्थानी या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. “काही दिवसांपूर्वी माझ्या कोथरूड मतदारसंघातील कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले असल्याचे सांगत आज पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वातील सर्व पोलीस टीमचा सत्कार करुन अभिनंदन पाटील यांनी केले. याप्रसंगी त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा सार्थ अभिमान असल्याचा पुनरुच्चार चंद्रकांत पाटील यांनी केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.