ओंकारेश्वर मंदिराजवळ दशक्रिया विधी घाट येथे बसविण्यात आलेल्या सीसीटिव्हींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

26

पुणे: हिंदू चालीरीतींनुसार एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी म्हणजे दशक्रिया! पुणे शहरात हा विधी मुठा नदीच्या काठावर आणि ओंकारेश्वर मंदिराच्या जवळच असणाऱ्या घाटावर होतो. शहरातील अनेक नागरिक निधन झालेल्या आपल्या नातेवाईकांना मुक्ती मिळावी, यासाठी प्रार्थना करत असतात.

आज पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या दशक्रिया विधी घाट येथे बसविण्यात आलेल्या सीसीटिव्हींचे लोकार्पण पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

गेली काही काळापासून या घाटावर चोरीच्या घटना घडत असल्याचे इथल्या पुजारी मंडळींनी पाटील यांच्या निदर्शनास आणले होते. त्यामुळे या घटनांवर चाप बसविण्यासाठी पाटील यांनी लोकसहभागातून सीसीटीव्ही यंत्रणा बसवून आज कार्यान्वित केले.

यावेळी प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपचे युवा नेते कुणाल टिळक यासोबतच कसबा मतदारसंघांतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.