दिव्यांग सहायता अभियानास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती, 2000 हजार दिव्यांगांनी घेतला लाभ

19

पुणे: काल राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी सेवा दिन साजरा केला.

मुरलीधर मोहोळ यांनी या निमित्त दिव्यांग सहायता अभियानाच्या माध्यमातून पुण्यातील तब्बल दोन हजारहून अधिक दिव्यांग या व्यक्तींना सुसह्य उपकरणांचे वाटप केले. यासोबतच दिव्यांग रोजगार नोंदणी-मार्गदर्शन शिबीर आणि कृत्रिम अवयव मोजमाप आणि नोंदणी शिबिर देखील यावेळी संपन्न झाले.

या शिबिरास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी दिव्यांग बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि मुरलीधर मोहोळ यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी पुण्याचे भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष धीरज घाटे यांच्या समवेत पुण्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.