कोथरूड मधील उदयोन्मुख जलतरण पटुला चंद्रकांतदादांचा आधार

38

पुणे: कोथरूड मतदार संघातील कु. गीता मालुसरे या उदयोन्मुख जलतरणपटूने आज पर्यंत अनेक जलतरण स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी करुन घवघवीत यश मिळविले आहे. देशासाठी ऑलम्पिक मेडल मिळवण्याचं त्यांचं स्वप्न असल्याचे ती सांगते. मात्र, नोव्हेंबर २०२२ मध्ये विजयदुर्ग परिसरात झालेल्या स्पर्धेत समुद्रात पोहताना विषारी जेली फिशने त्यांच्या हाताला चावा घेतला. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने त्यांना या संकटातून बाहेर काढण्यात यश आले. पण काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले.

पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार यांच्या प्रयत्नाने नुकतीच लोकसहभागातून कु. गीता हिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

आज पालकमंत्री पाटील यांनी कु. गीता मालुसरे हिची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली, तसेच त्यांचे देशासाठी ऑलम्पिक मेडल मिळवण्याचे स्वप्न पूर्णत्वास जावो अशा सदिच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.