पुण्यातील मोतीबाग म्हणजे प्रचंड उर्जेचा, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, मायेचा स्रोत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

4
पुणे : रा. स्व. संघ परिवारातील प्रत्येक स्वयंसेवकांसाठी नागपूरचे रेशीमबाग आणि पुण्यातील मोतीबाग म्हणजे प्रचंड उर्जेचा, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, मायेचा स्रोत आहे. देशभरातून नागपूर आणि पुण्यात येणारे लाखो स्वयंसेवक या दोन्ही ऊर्जास्रोतांकडे आपले हक्काचे ठिकाण म्हणूनच पाहतात, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. आज मोतीबागेच्या विस्तारित नूतन वास्तूच्या लोकार्पण प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी भारतमातेला अभिवादन केले. तसेच, परम पूजनीय गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपोत्सव साजरा केला. यावेळी नूतन वास्तूच्या शुभारंभ प्रसंगी अनेक जुन्या स्वयंसेवक बंधूंची त्यांनी भेट घेतली. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, सोबत नव्या वास्तूचे चित्र डोळ्यात साठवताना, आपले कार्य असेच दृढ करुया, अशा सर्व स्वयंसेवकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि हे दोन्ही ऊर्जास्रोतांप्रती विद्यार्थी परिषदेच्या काळापासून माझे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळले आहेत. यातील पुण्यातील मोतीबागेसोबत अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आणि १९९५-१९९९ संघाचा पश्चिम महाराष्ट्र सहकार्यवाह म्हणून दायित्व सांभाळताना, पुण्यात होणाऱ्या बैठकींचे ठिकाण म्हणजे मोतीबाग! या बैठकींच्या निमित्ताने अनेक गुरुतुल्य प्रचारकांसोबत विविध विषयांवर मनसोक्त संवाद व्हायचा. त्यातून जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन मिळायचा.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, आज बदलत्या काळानुसार मोतीबागेचे रुपही बदलले आहे. त्यामुळे आज ही नव्याने उभारलेली वास्तू म्हणजे जुन्या आणि नव्याचा अनोखा संगमच म्हणावा लागेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.