महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन नेहमीच कटिबद्ध असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच प्रयत्नशील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

4
पुणे : पुण्यामधील भोर येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार महिलांचा किरण दगडे पाटील मित्र परिवाराच्या वतीने सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन नेहमीच कटिबद्ध असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीही महिलांच्या सन्मानासाठी लखपती दिदी सारखी योजना देशभारत राबवली आहे. कोथरुड मतदारसंघातही महिला स्वावलंबनासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शिवाय, किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून भोर तालुक्यातही महिलांसाठी असे विविध उपक्रम राबविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.