पुणे : आज पुणे येथे एमएनजीएल आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या दुसऱ्या मोबाइल मेडिकल व्हॅनचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांना आवश्यक पाठबळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही या वेळी पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पुणेकरांच्या उत्तम आरोग्यासाठी समर्थ युवा फाउंडेशन आणि एमएनजीएलच्या मोबाइल मेडिकल व्हॅनसारखे उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. समर्थ युवा फाउंडेशनची ही मोबाइल व्हॅन पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत सेवा देणार असून, या व्हॅनच्या माध्यमातून महिलांमधील स्तनांचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, रक्तदाब, रक्तातील घटक, कोलेस्टेरॉल, डोळे, दात, रक्त, आरोग्य, रक्तातील साखर आदी तपासण्या करून; तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अहवाल दिला जाईल.
या प्रसंगी समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, एनवायसीएसचे अध्यक्ष तथा समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त प्रकाश साहू, एमएनजीएलचे संचालक कुमार शंकरजी, सीएसआरचे बागेश्री मंठाळकर, माजी आमदार दीपक पायगुडे, डॉ. आशीष घोष, डॉ. रत्नदीप जाधव, भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.