चंद्रकांत पाटील यांनी आज नाणेगावातील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी गणेश भिल्लारे आणि पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी बाळासाहेब कोंढाळकर यांच्याशी  साधला संवाद

3

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज गाव चलो अभियानाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाणेगावातील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी गणेश भिल्लारे आणि पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी बाळासाहेब कोंढाळकर यांच्याशी संवाद साधला.

पाटील यांनी माहिती दिली कि, यावेळी भिल्लारे आणि कोंढाळकर यांनी कृतार्थाने आपले अनुभव व्यक्त केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कामावर देशातील सर्वसामान्य नागरिक समाधानी आहे, असे त्यांचे अनुभव ऐकल्यावर जाणवत होते. याचसोबत या भेटीवेळी पुढील पंचवार्षिक मध्ये माननीय मोदीजीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी भावना प्रत्येक ग्रामस्थ व्यक्त करत होता, असे पाटील यांनी सांगितले.
यानंतर भारतीय जनता पार्टीच्या ‘गाव चलो अभियानांतर्गत’ भाजपा नाणेगाव बूथ समिती पदाधिकाऱ्यांशी पाटील यांनी बैठक घेतली‌. दरम्यान माननीय मोदीजींचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी संपर्क अभियानावर भर द्यावा. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बूथ सशक्तीकरणावर देखील भर द्यावा, अशा सूचना यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.