अध्यासन केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

3

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील कै. बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. या इमारतीच्या बांधकामाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. याप्रसंगी, अध्यासन केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी पाटील यांनी दिले.

चंद्रकांत पाटील यांनी कलिना परिसरातील जलतरण तलावाची पाहणी करून त्याच्या नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू अजय भामरे, मुंबई विद्यापीठाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.