राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स गठीत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

12

मुंबई : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंमलबजावणी ला अधिक गती देण्यासाठी नी विद्यार्थी हितासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत राज्यस्तरीय “टास्क फोर्स” गठीत करण्यात आली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम, Academic Bank of Credits (ABC), Major-Minor पद्धती, Internship, Indian Knowledge System (IKS), तसेच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध शैक्षणिक, प्रशासकीय व तांत्रिक बाबींमध्ये एकसमान मार्गदर्शनाची आवश्यकता लक्षात घेऊन विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश या समितीत करण्यात आला आहे.

टास्क फोर्समार्फत चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमातील चौथ्या वर्षाची रचना, OJT/Internship संदर्भातील कार्यपद्धती, Credit Transfer, Multiple Entry-Exit, Migration, Uniform Academic Calendar, IKS अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी मदत कक्ष, तसेच शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याशिवाय, राज्यातील सर्व विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमधील NEP अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या शिफारशी शासनास सादर करण्यात येणार आहेत. ही समिती दर तीन महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करणार आहे.महाराष्ट्रातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या दृष्टीनेहा महत्वपूर्ण निर्णयघेण्यात आला आहे.असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.