यूपीएससी २०२७ मोफत प्रशिक्षणासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे (CET) सुधारित वेळापत्रक जाहीर; ३० जूनपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत
मुंबई : UPSC पूर्व परीक्षा २०२७ च्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे (CET) सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ‘राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था’ (SIAC), मुंबई आणि राज्यातील इतर शासकीय केंद्रांच्या वतीने ही मोफत प्रशिक्षण प्रक्रिया राबवली जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन राज्यातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना केले आहे.
अर्जाची मुदत आणि परीक्षेची तारीख:
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: १ जून ते ३० जून २०२६ पर्यंत.
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २ जुलै २०२६ पर्यंत.
प्रवेश परीक्षेची तारीख: २ ऑगस्ट २०२६ (ऑफलाईन पद्धत).
अधिकृत संकेतस्थळ:
या परीक्षेच्या सविस्तर माहितीसाठी आणि ऑनलाईन नाव नोंदणीसाठी पात्र उमेदवारांनी आजच www.siac.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.