चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात सामान्य ज्ञानावर आधारित ‘नमो चषक क्वीज’ ही स्पर्धेचे आयोजन
पुणे : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात “नमो चषक २०२४” स्पर्धा आयोजित केली जात आहे.भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या कोथरूड मतदार संघात या स्पर्धांचे आयोजन केले आहे.