सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. आज ते सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली लोकसभा प्रवासादरम्यान शिवसेना उपजिल्हाप्रमुख वीर कुदळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दरम्यान बावची येथील विलासराव शिंदे विकास सेवा सोसायटी येथे प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बैठक देखील घेतली.
चंद्रकांत पाटील यांनी सांगली प्रवासादरम्यान शिवसेना उपजिल्हाप्रमुख वीर कुदळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कुदळे परिवाराने अतिशय आपुलकीने स्वागत आणि आदरातिथ्य केले. दरम्यान बावची येथील विलासराव शिंदे विकास सेवा सोसायटी येथे प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक पाटील यांनी घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयी करण्याच्या दृष्टीकोनातून सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने, एकजुटीने आणि जोमाने कार्यरत असावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल महाडिकही सोबत होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.