आगामी लोकसभा निवडणुकीत मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना ऐतिहासिक मतांनी विजयी करा – चंद्रकांत पाटील

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. या सोलापूर प्रवासादरम्यान पाटील यांनी मोहोळ तालुकातील पेनुर येथे कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून संबोधित केले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अविश्रांत मेहनत घेतली असून देशात विकासाला गती देण्याची गॅरंटी देखील घेतली आहे. म्हणूनच, आगामी लोकसभा निवडणुकीत मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना ऐतिहासिक मतांनी विजयी करा, असे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!