महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ९-० असा ऐतिहासिक विजय; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन

11

नाशिक : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) सर्वच्या सर्व जागा जिंकून ९-० असा निर्विवाद आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे . अभाविपच्या या दणदणीत विजयाबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त केला असून हा विजय निश्चितच अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

या निवडणुकीत अभाविपच्या पॅनलमधून विजय मिळवलेले लक्ष्मीकांत होनकळस मोकाशे, आदित्य जायभाय, शुभांकर मनगटे, रोहित माळी, यशराज काकड, मिथिलेश माहोरे, ज्ञानेश्वर आंधळे, केशव पाटील आणि देवांशी भुराणे या नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रश्नांच्या तातडीने निराकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यापीठ स्तरावर अत्यंत प्रभावीपणे कार्य करावे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युवा-केंद्रित आणि प्रगतीशील विचारांची मोठी प्रेरणा घेऊन आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थीहिताचे एक नवे आणि आदर्श पर्व घडवावे,” अशा सदिच्छा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या . आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या निकालानंतर राज्यातील अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.