सातारा : लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने पाटील यांनी साताऱ्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्हयाच्या दौऱ्यादरम्यान साताऱ्यातील दिग्विजय मोरे, मंदार जोशी आणि सुनील नाकोड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधला.
त्यांनतर पाटील यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी थोरात कुटुंबातील सदस्यांसह परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित रहिवाशांचीही भेट झाली. या सगळ्यांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल पाटील यांनी मनापासून आभार मानले.
Get real time updates directly on you device, subscribe now.