भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून तात्यांच्या कार्याचा गौरव

6

सांगली :सांगली जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणातील एक आदरणीय नाव, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्त सांगलीत एका भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून तात्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रकाशतात्या हे केवळ पक्षाचे नेते नसून ते कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक आहेत. त्यांचे सामाजिक कार्याप्रती असलेले समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्याच्या विविध भागातून तात्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

या सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, निताताई केळकर, भगवानराव साळुंखे, राजाराम गरुड, नितीन देशमाने, पृथ्वीराज पाटील, संगीता खोत, अतुल माने, नगरसेवक संतोष पाटील, केदार खाडिलकर, मोहन वाटवे, विेश्वजीत पाटील, मंगेश मंत्री यांच्यासह तात्यांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.