सांगलीच्या वैभवात भर; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण… पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्मारकाची पाहणी

12

सांगली : सांगली येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, नूतन उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी या स्मारकाला भेट देऊन पाहणी केली आणि बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

सांगलीच्या वैभवात भर घालणारे हे स्मारक येणाऱ्या पिढीला संविधानाप्रती आणि राष्ट्रभक्तीप्रती सदैव जागृत ठेवेल, असा विश्वास असल्याचे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.

या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य १४ फुटी ब्रॉन्झ धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचा सर्वात मोठा पुतळा मानला जात असून त्याचे वजन सुमारे १६०० किलो आहे. स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सांगलीत प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला. हे स्मारक केवळ एक वास्तू नसून ते समता आणि न्यायाच्या विचारांचे प्रतीक आहे.

या प्रसंगी सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजपा शहराध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार, स्वीकृत नगरसेवक केदार खाडिलकर आणि इतर सर्व मान्यवर व भीमानुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.