उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आर.के.लक्ष्मण फाउंडेशन आणि डॉ.होमी भाभा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

34

मुंबई : स्व.आर.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्र दालन संदर्भात आर.के.लक्ष्मण फाउंडेशन आणि डॉ. होमी भाभा विद्यापीठ,मुंबई यांच्यात मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी आणि आर. के. लक्ष्मण फाउंडेशन यांच्यातील या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आर. के. लक्ष्मण यांच्या सर्जनशील तत्त्वज्ञानाचा समावेश करून कला शिक्षणाचा विकास करणे आहे. या सहयोगाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कला आणि संवाद शिक्षण सुधारण्यासाठी प्रशिक्षण आणि सर्जनशील अभिव्यक्ती, चिंतनशील विचार, आणि संवाद कौशल्ये विकसित करण्याच्या संधी प्रदान करणे आहे.

या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी आणि आर. के. लक्ष्मण फाउंडेशन ११ वी इयत्तेपासून पुढील विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षण कार्यक्रम सह-निर्मित आणि व्यवस्थापित करतील. या कार्यक्रमांमध्ये संग्रहालय दौऱ्यांचे आयोजन, कार्यशाळा, आणि ख्यातनाम कलाकारांशी संवाद अशा प्रत्यक्ष शिक्षणाच्या संधी समाविष्ट केल्या जातील. शिवाय, आर. के. लक्ष्मण फाउंडेशन डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावहारिक कौशल्ये आणि सर्जनशील विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

हा सामंजस्य करार करताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत, डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव विलास पाध्ये,आर.के.लक्ष्मण फाउंडेशनचे संचालक उषा लक्ष्मण, डॉ.विशाल बानेवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव विलास पाध्ये यांनी तर आर.के.लक्ष्मण फाउंडेशनचे संचालक उषा लक्ष्मण यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.