गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाने एक वेगळेच समाधान मिळाले – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
सातारा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांच्या दर्शनाने एक वेगळेच समाधान मिळाले असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राम नामाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या गोंदवलेकर महाराजांच्या चरणी मी आज लीन झालो. महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य रामनामाच्या प्रचार प्रसाराचे कार्य करतानाच; असंख्य लोकांना व्यसन, दुराचरण, दुरभिमान यापासून मुक्त केले. तसेच प्रत्येकाच्या जीवनात चैतन्य फुलवले. त्यामुळेच त्यांना ब्रह्मचैतन्य म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आज महाराजांच्या दर्शनाने एक वेगळेच समाधान मिळाले, असे पाटील यांनी म्हटले.