करवीरमधील सामाजिक कार्यकर्ते सरदार राणगे यांचा भाजपामध्ये प्रवेश; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्वागत

11

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सरदार राणगे यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारांवर आणि कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत केले आणि त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेशाप्रती आनंद व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सरदार राणगे यांच्यासारखे समाजहिताची भावना आणि जनसेवेची तीव्र तळमळ बाळगणारे खंदे कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेल्याने भारतीय जनता पार्टीचे करवीर तालुक्यातील संघटन अधिक बळकट आणि गतिमान होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. सरदार राणगे यांच्या पक्षप्रवेशामुळे करवीर तालुक्यातील भाजपाच्या ताकदीत मोठी भर पडली असून, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा प्रदेश पदाधिकारी विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.