कुपवाडच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा!… १०० फुटी भव्य तिरंगा ध्वज आणि कै. शरद पाटील स्मृती उद्यानाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

4

सांगली : कुपवाड शहराच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक वैभवात मोठी भर घालणाऱ्या १०० फुटी उंच भव्य भारतीय तिरंगा ध्वज (High Mast National Flag) तसेच कै. माजी आमदार शरद पाटील स्मृती उद्यानाच्या (Memorial Park) कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते आज अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे कुपवाड परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून नागरिकांना एक उत्तम विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “कुपवाडच्या सर्वांगीण विकासासाठी लोकाभिमुख आणि विकासाभिमुख उपक्रम सातत्याने राबविण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. हा भव्य १०० फुटी तिरंगा कुपवाडकरांमध्ये राष्ट्रभक्तीची चेतना अखंड जागृत ठेवत राहील, तर कै. शरद पाटील स्मृती उद्यान कुपवाडच्या सौंदर्यात आणि वैभवात निश्चितच मोठी भर घालेल.

“या दिमाखदार भूमिपूजन सोहळ्याला सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, जयश्री पाटील, संगीता खोत, पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह महायुती व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि कुपवाडचे ग्रामस्थ अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.