‘सेवादूत अभियानाच्या’ प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबईत भाजपा मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

7

मुंबई, १८ नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्यातील भाजपाच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ‘सेवादूत अभियानाची’ प्रभावी अंमलबजावणी, जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय सदस्यांच्या नियुक्त्या आणि संघटनात्मक कार्याचा विस्तार या विषयांवर सविस्तर चर्चा झाली असून, या बैठकीस राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासह पक्षाची विचारधारा जनमानसात अधिक प्रभावीपणे रुजविण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. समाजातील वंचित आणि शेवटच्या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवत असून, ही माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याबाबत बैठकीत विशेष विचारविनिमय झाला.

या महत्त्वपूर्ण बैठकीस मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री नितेश राणे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आकाश फुंडकर, मंत्री अतुल सावे, मंत्री अशोक उईके, मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, माध्यम विभाग प्रमुख गोविंद येतयेकर, प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.