डॉ. प्रमोद नाईक यांच्याकडे तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) चा अतिरिक्त कार्यभार सुपूर्द; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

10

मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे (MSBTE) संचालक डॉ. प्रमोद नाईक यांच्याकडे आज तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) चा अतिरिक्त कार्यभार अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. प्रमोद नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

नुकतेच तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर हे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदाची धुरा डॉ. प्रमोद नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. डॉ. नाईक यांना प्रशासकीय कामाचा आणि तंत्रशिक्षण क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे.

याप्रसंगी विश्वास व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, डॉ. प्रमोद नाईक यांच्या कुशल, अनुभवी आणि गतिमान नेतृत्वाखाली तंत्रशिक्षण संचालनालयाचे कामकाज आगामी काळात अधिक पारदर्शक, गतिमान आणि पूर्णपणे विद्यार्थीभिमुख होईल. डॉ. नाईक यांच्या या नवीन जबाबदारीमुळे राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रलंबित कामांना गती मिळेल आणि शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.