प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने प्रभावीपणे कार्य करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

5

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत म्हटले कि, सामान्य नागरिकांना आवश्यक असलेले विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सहज, सुलभ आणि वेळेत मिळावा, या उद्देशाने या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासन आणि प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, अशा लोकाभिमुख उपक्रमांमुळे नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागतात. प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने प्रभावीपणे कार्य करावे, असे यावेळी पाटील यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमास कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, उपजिल्हाधिकारी विजया यादव, मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव, मुद्रांक जिल्हाधिकारी प्रमोद कदम, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समाजकल्याण समिती सभापती गीता पवार, सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे, माजी आमदार दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.