सांगलीमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारत विकास परिषद व MNGL चा अंत्योदय उपक्रम

13

सांगली : महाराष्ट्र नॅचरल गॅस (MNGL)च्या सहकार्यातून आणि भारत विकास परिषद, सांगलीच्या संयोजनातून दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाच्या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व लाभार्थींना शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमबद्दल मत व्यक्त करताना पाटील म्हणाले, दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे बळ मिळते. यापूर्वी कोथरुडमध्येही हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी एका अपघातामुळे दिव्यांगत्व आलेल्या ९ वर्षांच्या चिमुकलीला कृत्रिम अवयव बसवल्यानंतर ती पुन्हा धावताना पाहण्याचा भावस्पर्शी क्षण अनुभवता आला. आपल्या मुलीला पुन्हा धावताना पाहून तिच्या वडिलांसह उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत आनंद आणि आश्चर्य दिसून आले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारानुसार, समाजातील शेवटच्या घटकाचे जीवन अधिक सुसह्य आणि स्वाभिमानी करणे हाच खऱ्या अर्थाने विकास आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनविणारे असे उपक्रम त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणारे ठरतात, असेही पाटील यांनी म्हटले.

या प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, MSEB संचालिका नीता केळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश देशमाने, भारत विकास परिषद सांगली शाखेचे अध्यक्ष मोहन बापट, सचिव शिरीष कुलकर्णी, खजिनदार राजशेखर अभ्यंकर, श्रीवल्लभ कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, विनय खटावकर, श्रीराम कुलकर्णी, शैलेंद्र तेलंग आदी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.