राज्यातील खासगी विद्यापीठांच्या संबंधित निकषांचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या डॉ. भूषण पटवर्धन समितीची आढावा बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

13

मुंबई : राज्यातील खासगी विद्यापीठांच्या संबंधित निकषांचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या डॉ. भूषण पटवर्धन समितीची आढावा बैठक आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत खासगी विद्यापीठांचे निकष, उच्च शिक्षणाचा दर्जा, भविष्यातील गरजा व कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच सर्वंकष अभ्यासांती योग्य शिफारसी सादर करण्यासाठी समितीला ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, निर्धारित वेळेत अभ्यास पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्याच्या स्पष्ट सूचना मंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, अमोल मुत्याल, प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे व समितीचे सदस्य (ऑनलाइन) उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.