श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मौजे रानवली, ता. श्रीवर्धन येथे सुरू असलेल्या आदर्श महिला महाविद्यालयाच्या कामाचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला सविस्तर आढावा

8

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मौजे रानवली, ता. श्रीवर्धन येथे सुरू असलेल्या आदर्श महिला महाविद्यालयाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगती आणि आवश्यक बाबींवर संबंधितांसोबत त्यांनी चर्चा केली.

यावेळी मंत्री पाटील यांनी एसएनडीटी कला व श्रीमती चंपाबेन भोगीलाल वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयाने सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक घेऊन महाविद्यालयाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा समावेश करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तसेच संबंधित अधिकारी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. हेमलता बागला, महाविद्यालयाचे प्राचार्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.