पीएम-उषा अंतर्गत असलेल्या सॉफ्ट कॉम्पोनंट योजना महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून राबविण्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक संपन्न

5

मुंबई : मंत्रालयात पीएम-उषा (PM-USHA) (प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान) अंतर्गत असलेल्या सॉफ्ट कॉम्पोनंट योजना महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या (MSFDA) माध्यमातून राबविण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत सर्वसमावेशक योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, प्रशासकीय स्तरावर अचूक नियोजन आखणे तसेच पुढील सर्व कार्यवाही कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर या योजनेचा लाभ राज्यातील शिक्षण क्षेत्राला गतीने व पारदर्शकपणे मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेने परस्पर समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे, अशा स्पष्ट सूचना यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.

याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, ‘रुसा’चे (RUSA) प्रकल्प संचालक डॉ. बी. एन. पाटील, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे आणि उपसचिव अमोल मुत्याल यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.