‘स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजने’ची विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

5

मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ‘स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजने’ची विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी योजनेचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी विद्यापीठांनी महाविद्यालयांना स्पष्ट सूचना देऊन तातडीने कार्यवाही सुनिश्चित करावी, असे निर्देश दिले. योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होऊ नये आणि विद्यापीठे-महाविद्यालयांमध्ये योग्य समन्वय राहावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देखील त्यांनी दिल्या.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अमोल मुत्याल, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.