बीड : जयदत्त आण्णा शिवबंधनात तर शिवसैनिक पेचात अडकणार…
आमचं ठरलंय.. प्रमाणे जयदत्त अण्णांनी शिवसेना प्रवेशासाठी बुधवारचा मुहूर्त काढल्याचं वृत्त बीडच्या एका वृत्त पत्राने केलं आणि बीडच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला. आता खर कि खोटं ते लवकरच कळेल.
महायुतीच्या व्यासपीठावर प्रथम पंकजा मुंडे नंतर उद्धव ठाकरे यांच्या सोबत सभांना हजेरी लावल्या नंतर आता आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेने मध्ये प्रवेश करायचं निश्चित केलं आहे. भूतकाळातील जिल्ह्याच्या राजकारणाचा आढावा घेतला तर शिवसैनिक आणि क्षीरसागर ( दोन्हीही ) यांच्यात कधी जुळून आलेल पहिला मिळालेल नाही उलट शिवसेना संपावी म्हणून नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या जयदत्त अण्णांचा प्रवेश इतकी वर्षांपासून निष्ठावंत राहिलेल्या कडवट शिवसैनिकाच्या किती पचनी पडेल सांगता येत नाही.
पंकजाताईंनी मात्र पुढाकार घेत स्वतःचे स्थान आबाधीत ठेवत, हे घडवून आणण्यात यश मिळविले आहे. मात्र अनेक निष्ठावंत शिवसैनिक या आधीच सेनेला जय महाराष्ट्र करून मोकळे झाले आहेत. बीड लोकसभेचा निकाल काही असो पण बीड विधानसभा लढत दमदार नेत्यांमध्ये होणार आहे हे नक्की. अशा परिस्थिती मध्ये सामान्य शिवसैनिक नक्की पेचात अडकणार कि विधानसभेआधी जयदत्त अण्णा यांना पेचात पाडणार या कडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.