सरकारला प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत गुन्हे दाखल करायचे , संजय राऊत यांचे टीकास्त्र

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सिल्ली येथे प्रसामाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी  सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले कि, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करणं या एकमेव हेतूने राज्याचे राजकारण सुरु आहे. देशाच्या न्यायालयातील न्याय मेला नाही. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून अजूनही लोकांना न्यायाची अपेक्षा आहे, असे राऊत यांनी म्हटले.

देशात फक्त विरोधी पक्ष नेत्यांना लक्ष्य करत ईडी  आणि सीबीआय माध्यमातून अटक करण्यात येते. सत्ताधारी पक्षाचे नेते दुधाने अंघोळ करतात का? आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा  आणि नारायण राणे तुरुंगात असायला हवे होते. अशी भाजपाची भूमिका होती. आज त्यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री आहेत, अशी टिपण्णी राऊत यांनी यावेळी केली.

राऊत यांनी पुढे म्हंटले कि, क्राउड फंडिंग प्रकरणात आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या मोठे पैसे गोळा करतात, त्यांना क्लीनचिट मिळते. याचा अर्थ स्पष्ट आहे , सरकारला प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत गुन्हे दाखल करायचे , असे संतापजनक वक्तव्य राऊत यांनी केले.  किरीट सोमय्या सारखे भंपक लोक कोणत्या आधारावर आरोप करतात. कशाच्या आधारावर चौकश्या केल्या जातात, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!