देवेंद्र फडणवीस मुंबईतील ऑटोरिक्षाचालक, टॅक्सीचालक, फेरीवाले यांच्या मदतीला

2

मुंबई: महाराष्ट्रराज्याचे माजी मुख्मंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुंबईतील ऑटोरिक्षाचालक, टॅक्सीचालक, फेरीवाले यांच्या मदतीला धावून आलेआहेत. नुकतीच त्यांनी मुंबई येथे कामगार नेते शशांक राव यांची भेट घेऊन मुंबईतील ऑटोरिक्षाचालक, टॅक्सीचालक, फेरीवाले यांच्यासाठी अन्नधान्याच्या 30 हजार किट्स राव यांना सुपूर्द केल्या.
‪प्रत्येक किटमध्ये एका कुटुंबाकरिता तांदूळ, कणिक, डाळ, तेल, साखर, चहा पावडर आणि मीठ अशी सामुग्री देण्यात आली आहे, यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल चालू आहेत, या परिस्थितीमध्ये हि मदत अनेकांसाठी संजीवनी ठरू शकते.