पुण्यात पाच वॉर्डांचा हॉटस्पॉट परिसर ‘सील’

15

वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आज पाच वॉर्डांच्या हॉटस्पॉट परिसरात प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हा परिसर पुणे शहर पोलीस यांच्या साह्याने सील करण्यात आला आहे.

लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी व उपाययोजनांबाबत पुणे शहरातील पाटील इस्टेट झोपडपट्टी, कामगार पुतळा झोपडपट्टी, ताडीवाला रोड झोपडपट्टी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी येरवडा भागात महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह आज पाहणी केली.

Source : Pune Smart City