भाजप युवा मोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी ‘तुषार हिंगे’

129

पिंपरी चिंचवड शहराचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे यांची भाजप युवा मोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये युवकांचा मोठा संच असलेले आणि अनेक सामाजिक कार्यात आपल्या आरंभ फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असलेले तुषार हिंगे यांच्यावर हि जवाबदारी युवामोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सोपविली आहे. 


तुषार हिंगे पिंपरी चिंचवड, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रात युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून त्यांच्या लोकप्रियतेचा आणि संघटन कौशल्याचा फायदा येणाऱ्या काळात भाजपला झाल्या शिवाय राहणार नाही. 

आज पिंपरी चिंचवड भाजप कार्यालयात त्यांचा सत्कार शहर भाजपच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, युवामोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, भाजप  प्रदेश सचिव अमित गोरखे आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

Get real time updates directly on you device, subscribe now.