‘मला आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं’ – देवेंद्र फडणवीस

12

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…हा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा डायलॉग चांगलाच गाजला. यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मन की बात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना ते मुख्यमंत्री नाही आहेत, असं वाटतच नाही आहे. त्यांना आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं, असं त्यांनी जाहीर सभेत वक्तव्य केलं आहे.

नवी मुंबई येथे महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही, तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेने देखील हे जाणवू दिलं नाही की मी आता मुख्यमंत्री नाही आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतोय. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा गोवर्धिनी मातेकडेच मी येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू, असा विश्वासही व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.